ही महाराष्ट्राशी गद्दारी; हेगडेंच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

183

मुंबई,दि.२(पीसीबी) – “केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या ४० हजार कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस हे चार दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा निधी परत केंद्राकडे पाठवला,” असं हेगडे म्हणाले होते. त्यांच्या विधानावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ही महाराष्ट्राशी गद्दारी असल्याचं सांगत संताप व्यक्त केला आहे.

“तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आमचा माणूस महाराष्ट्रात ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनला होता. त्यानंतर फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी हे नाटक कशासाठी केलं? बहुमत नसतानाही ते मुख्यमंत्री कसे झाले? असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. त्याचे हे उत्तर आहे, असेही हेगडे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. “महाराष्ट्राचा ४० हजार कोटींचा विकासनिधी केंद्राकडे परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले, भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे सांगत आहेत. ही महाराष्ट्रासोबत गद्दारी आहे,” असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

WhatsAppShare