ही नैसर्गिक स्थिती आहे, उगीचच पालिकेला दोष देऊ नका – आदित्य ठाकरे

0
527

मुंबई, दि, २ (पीसीबी) – मुंबईमधील गेल्या दोन ते तीन दिवसापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत अनेक भागात पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाल्याने मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता मुंबईत तुंबलेल्या पाणी प्रश्नावर युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. मुंबईला पावसाने झोडपून काढलंय. जनजीवन विस्कळीत झालंय. मात्र ही नैसर्गिक स्थिती आहे, उगीचचे पालिकेला दोष देऊ नका, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले.

गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुचे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईत जागोजागी पाणी तुंबले आहे. विरोधकांनीही या मुद्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत कुठेच पाणी तुंबले नाही असा दावा केला. ठाकरे यांनीही यावर भाष्य केले आहे की, ही नैसर्गिक स्थिती आहे, उगीचच पालिकेला दोष देऊ नका, असे वक्तव्य केले.