ही अखेरची महामारी नाही; पुढील महामारीसाठी सज्ज व्हा – WHO चा इशारा

584

विदेश,दि.०८(पीसीबी) – “ही अखेरची महामारी नाही. इतिहास आपल्याला शिकवतो की, महामारी आणि उद्रेक या गोष्टी जीवनातील वास्तव आहे. परंतु जेव्हा पुढची महामारी येते, तेव्हा जगानं त्याचा सामना करण्यासाठी आता आहे त्यापेक्षा अधिक सज्ज असायला हवं,” असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयसियस यांनी म्हटलं आहे.

भारतासह जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अनेक देश करोनाविरुद्धची लढाई लढत असून, चीनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून आतापर्यंत जगातील २७.१९ मिलियन लोकांना आतापर्यंत करोनाचा संसर्ग झाला आहे. तर ८ लाख ८८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. करोनाचं संकट अजूनही संपलेलं नाही. त्यातून जग अजून बाहेर पडलेलं नसतानाच जागतिक आरोग्य संघटनेनं पुढील काळात येणाऱ्या महामारीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान करोना महामारीनं संपूर्ण जग हैराण झालं आहे. करोना विषाणूनं जगाचं चित्र बदलून टाकलं असून, भारतासह अनेक देश या महामारीचा सामना करत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची मृतांची संख्या वाढत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेनं आणखी एक इशारा वजा सल्ला दिला आहे. जगानं अधिक तयारीनं पुढील महामारीसाठी सज्ज असलं पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयसियस यांनी म्हटलं आहे.

WhatsAppShare