हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम नगरसेवकाचा माज

5529

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज (शुक्रवारी) औरंगाबाद महापालिकेत सर्वसाधारण सभेमध्ये  श्रद्धांजली ठराव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला. त्यावरून भाजप नगरसेवकांनी मतीन यांना बेदम मारहाण केली.

यावर एमआयएम नगरसेवक मतीन याने संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला मी लोकशाही पद्धतीने विरोध केला होता. मात्र, भाजपचे नगरसेवकांनी थेट माझ्यावरच हल्ला चढवला. दहा-दहा जणांनी हल्ला करून सभागृहाचा अवमान केला, हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते. मग त्यांना दाखवले असते, हल्लाखोर भाजपच्या नगरसेवकांवर महापौरांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ही एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी केली आहे.