हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जवाबदारी NSA कडे

117
दिल्ली, दि.२६ (पीसीबी) – दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 
सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) वरून दिल्लीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जवाबदारी NSA कडे देण्यात आली आहे. दिल्लीत काय परिस्थिती आहे याची माहिती डोवाल पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाला देणार आहेत. मंगळवारी रात्री डोवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी आणि भजनपुरा येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.
अजित डोवाल  म्हणाले, ‘’कायद्याचे पालन करणाऱ्या कोणाचेही नुकसान होणार नाही. शहरात पुरेसे सैन्यबल तैनात केले आहे, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. लोकांना सुरक्षदलावर विश्वास ठेवावा लागेल.’’ असे अजित डोवाल म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत माहिती दिली.