हिंसक, जाळपोळीचे प्रकार थांबवून मराठा आंदोलकांनी शांतता राखावी – शरद पवार

77

मुंबई, दि. ११ (पीसीबी) –  मराठा आंदोलनाला बदनाम करून मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव हाणून पाडा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर हिंसक, जाळपोळीचे प्रकार थांबवून मराठा आंदोलकांनी शांतता राखण्यावर भर  द्यावा’, असे आवाहनही पवार यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.