हिंदू कट्टरपंथीयांच्या हिटलिस्टवर जितेंद्र आव्हाडांसह ४ जण; एटीएसची न्यायालयात माहिती

85

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हिंदू कट्टरपंथीयांच्या हिटलिस्टमध्ये श्याम मानव, जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर, अजित पवार आणि रितू राज यांचा देखील समावेश होता, अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणीदरम्यान ही माहिती समोर आली आहे.