हिंदूनी मुस्लिम महिलांवर घरात घुसून बलात्कार करावा; भाजप महिला नेत्याचे वादग्रस्त विधान

0
686

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – हिंदूनी मुस्लिम महिलांवर घरात घुसून बलात्कार करावा,  असे चिथावणीखोर विधान उत्तर प्रदेशातील रामकौला येथील भाजपच्या महिला नेत्या सुनिता सिंग गौड यांनी केले आहे. या विधानामुळे मोठे वादंग उठण्याची शक्यता आहे.   

फेसबुक पोस्टवर कमेंट करताना सुनिता सिंग गौड यांनी म्हटले आहे की,  यावर एकच उपाय आहे… १० हिंदू भावांनी एकत्रित येत मुस्लिमांच्या बहिण आणि आईवर सार्वजनिकपणे रस्त्यावर बलात्कार करावा.  बलात्कार केल्यानंतर त्यांना कापून बाजाराच्या मधोमध लटकवा. दगडाचे उत्तर दगडानेच द्यावे लागेल, अशी संतापजनक कमेंट  केली आहे.

दरम्यान,  या प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या वादग्रस्त विधानामुळे सुनितासिंग गौड यांच्यावर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर राष्ट्रीय महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी संबंधित महिला पदाधिकाऱ्याला पक्षातून काढून टाकले आहे,  असे सांगितले आहे.