हिंदूंनी मटण खावे की नाही? त्रिपुराच्या राज्यपालांना नेताजींच्या वंशजाचा सवाल

221

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – देशात गोमांसावरुन होत असलेल्या जमावाकडून मारहाणीच्या घटना घडत असताना याला विरोध करताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वंशज आणि भाजपाचे पश्चिम बंगालचे उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. हिंदूंनी मटण खावे की नाही? असा सवालच त्यांनी त्रिपुराच्या राज्यपालांनाच केला आहे. ट्विटद्वारे त्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावरुन नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

चंद्रकुमार बोस यांनी म्हटले की, बकरी देखील गायीसमान असून हिंदूंना तिला मातेसमान मानायला हवे. आपले म्हणणे मांडण्यासाठी त्यांनी महात्मा गांधी आणि त्यांच्या खाण्याच्या सवयी समोर मांडल्या. त्याअनुशंगाने ते म्हणाले, हिंदूंनी बकरीचे मांस खाणे बंद करावे कारण राष्ट्रपिता तिला आई सारखे मानायचे. गांधींजी एकदा कोलकातामध्ये नेताजींचे पुत्र शरतचंद्र बोस यांच्या घरी थांबले होते, तेव्हा तिथे त्यांनी बकरीच्या दुधाची मागणी केली होती. त्यासाठी दोन बकऱ्यांची खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे गांधीजींनी बकरीच्या दुधाचा पिण्यासाठी वापर करीत तिला मातेचा दर्जा दिला होता.