हिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक

330

जालना, दि. २० (पीसीबी) – संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन दहशतवादविरोधी पथकाने रविवारी (दि.१९) संध्याकाळी जालना येथून शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर  याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा स्फोटके प्रकरणात वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने जालना येथून श्रीकांत पांगारकरला शनिवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचे संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रविवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. पांगारकर हा दोन वेळा शिवसेनेचा नगरसेवक होता. पांगारकरला दुपारी मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.