हिंजवडी भूमकर चौकातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपाचे बदल; नागरिकांना सूचना आणि हरकती पाठवण्याचे पोलिसांचे आवाहन

92

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी म्हणून पोलीस आयुक्तालयाकडून भूमकर चौकामधील वाहतुक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपाचे बदल करण्यात आले आहेत. सोमवार (दि. १७) ते बुधवार (दि. २६) दरम्यान हा बदल प्रायोगिक तत्वावर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी काढले आहेत.