हिंजवडीमध्ये कोविड केअर सेंटरची स्थापना केली

84

हिंजवडी, दि. १५ (पीसीबी) – हिंजवडी: टेक महिंद्राने घोषणा केली की कंपनी हिंजवडी येथील आपल्या सुविधेच्या आवारात कोविड केअर सेंटरची सुरुवात करत आहे. या सेंटरची सुरुवात पुण्यात सुरू असलेल्या करोना महामारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी करण्यात आली आहे. या केंद्रात रुग्णांसाठी २५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येथील आरोग्य सेवा व औषध सेवा रूबी हॉल क्लिनिक हिंजवडी युनिट यांच्या मार्फत दिल्या जाणार आहे. हे कोविड सेंटर टेक महिंद्राच्या कर्मचारी व त्यांच्या नातलगांना आरोग्य सेवा पुरवेल.या केंद्रात रुग्णांना रुबी हॉल क्लिनिक हिंजवडीच्या तज्ञ डॉक्टर्स व नर्सेसद्वारा आरोग्य सेवा दिल्या जातील. तसेच रुग्णांना या केंद्रात अन्न, औषधे ऑक्सीजन सेवा, वाय फाय व इतर सेवा उपलब्ध करून दिल्या जातील.

मनुष्यबळ विकास प्रमुख राजेंद्र केंभवी म्हणाले, महाराष्ट्र तसेच पुणे हे करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. आम्ही हिंजवडी मध्ये सुरू केलेले हे कोविड केअर सेंटर हा आमचा एक मदतीचा हात आहे, महाराष्ट्र सरकारच्या करोना विरोधाच्या लढ्यात. तसेच आम्ही रुबी हॉल क्लीनिक हिंजवडीच्या डॉक्टर आणि नर्सचे कृतज्ञ आहोत की त्यांनी आमच्याबरोबर जोडून लोकांना आरोग्य सेवा देण्याचे व्रत हाती घेतले आहे.

WhatsAppShare