हिंजवडीत सलमान खान याच्या दबंग इव्हेन्टमध्ये मालकी हक्काची गाणी प्रदर्शित करुन मोबदला न देणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हा

78

हिंजवडीत सलमान खान याच्या दबंग इव्हेन्टमध्ये मालकी हक्काची गाणी प्रदर्शित करुन मोबदला न दिल्याने सहकारी कंपनीच्या मालकाने इव्हेन्ट स्पॉन्सर कंपनीच्या मालकां विरोध्दात हिंजवडी पोलीस ठाण्यात आर्थीक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी नोवेक्स कंपनीचे मालक मोहम्मद सैय्यद (वय २९, रा. अधेरी, मुंबई) यांनी फोरपिलर्स इव्हॅन्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा, लिमी या कंपनीच्या डायरेक्टर समीर दिनेश पवानी व मॅनेजर मनिष यांच्या विरुध्द हिंजवडी पोलीस ठाण्यात आर्थीक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रसिध्द अभिनेत स्टार सलमान खान याचे सहकलाकार कॅटरीना काफ, मनिष पॉल, डेझी शाह , सोनाक्षी सिन्हा, प्रभुदेवा, गुरु रंधावा, यांच्या सोबत सध्या देशासह विदेशात दबंग इव्हेन्ट नावाचा स्टेज शो सुरु आहे. या शोला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतीसाद मिळत आहे. शनिवारी २४ मार्च हा दबंग इव्हेन्ट शो पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

पोलीसांनी दिलेल्यमा माहितीनुसार, शनिवारी (दि. २४, मार्च) महाळूंगे येथील बालेवाडी स्टेडीयमध्ये अभिनेता सलमान खान याचा सहकलाकारांसोबत दबंग इव्हेन्ट पार पडला होता. या कार्यक्रमा दरम्यान फिर्यादी नोवेक्स कंपनीचे मालक मोहम्मद सैय्यद यांच्या कंपनीकडील मालकी हक्क असलेली काही गाणी प्रदर्शीत करण्यात आली होती. या गाण्याचा मोबद्दला म्हणून दबंग इव्हेन्ट स्पॉन्सर कंपनी फोरपिलर्स इव्हॅन्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि या कंपनीने तीन लाखांचा चेक दिला फिर्यादी यांना दिला होता. तो चेक बाऊंस झाल्याने फिर्यादी सैय्यद यांनी फोरपिलर्स इव्हॅन्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि या कंपनीच्या डायरेक्टर समीर दिनेश पवानी व मॅनेजर मनिष यांच्या विरुध्द हिंजवडी पोलीस ठाण्यात आर्थीक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.