हिंजवडीत विद्यार्थिनीचा विनयभंग; आरोपी अटक

842

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – सायंकाळच्या सुमारास जॉगिंगला गेलेल्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१४) सायंकाळी सातच्या सुमारास हिंजवडीतील ब्लू रिच सोसायटीच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावर घडली.

याप्रकरणी पिडीत २५ वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार गुरु शंकर बिराजदार (वय ३०, रा. बिदर, हुमानबाद, कर्नाटक) या तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत २५ वर्षीय तरुणी हिंजवडीतील ब्लू रिच सोसायटीमध्ये राहते. ती रोज सायंकाळी ब्लू रिच सोसायटीच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावर जॉगिंगला जाते. मंगळवारी सायंकाळी ती त्याच ठिकाणी जॉगिंगला गेली होती. यावेळी मागून आलेल्या गुरुने तिला मिठी मारुन तिच्यासोबत गैरवर्तण केले. पिडीतेने कसेबसे तिला त्याच्या तावडीतून सोडवून हिंजवडी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुरुला अटक केली आहे.