भोसरीत माहेरहून फॉर्च्युनर गाडी घेऊन येण्यासाठी पतीचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य; गुन्हा दाखल

9602

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करुन एका संगणक अभियंत्या पतीने माहेरहून फॉर्च्युनर गाडी घेऊन ये नाही तर तुझ्यासोबत केलेले अनैसर्गिक कृत्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री उशिरा भोसरी येथून समोर आली.

याप्रकरणी पिडीत २४ वर्षीय विवाहितेने पती आणि सासरकडच्या मंडळींविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाह झाल्यानंतर पीडित २४ वर्षीय पत्नी पतीसोबत गोवा येथे फिरण्यासाठी गेली होते. त्यावेळी पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढत पत्नीचा मोबाईल संमतीशिवाय काढून घेतला आणि नग्न फोटो हे मित्राला पाठवून सेव करण्यास सांगितले. हे सर्व फोटो फेसबूक, नातेवाईक आणि इतर मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी पत्नीला दिली. तसेच माहेरहून फॉर्च्युनर गाडी घेऊन ये असा तगादा संगणक अभियंता पती, सासरे आणि नणंद यांनी लावला. त्यानंतर फिर्यादीच्या भावासह आई आणि वडिलांना नणंदने शिवीगाळ केली. याप्रकरणी २४ वर्षीय पत्नीने पतीसह, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.