हिंजवडीत पार्किंमधून ७० हजारांची दुचाकी चोरीला

116

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – पार्किंमध्ये लॉक करुन ठेवलेली ७० हजार रुपये किमतीची अॅवेंजर ही दुचाकी चोरट्याने चोरुन नेली. ही घटना शनिवारी (दि.२०) रात्री दहा ते रविवार (दि.२१) सकाळी साडेदहाच्या दरम्यान लाईफ रिपब्लीक सोसायटी, मारुंजी येथील पार्कींगमध्ये घडली.

याप्रकरणी अनिल रामगोपाल गुप्ता (वय ६०, रा. फ्लॅट क्र. ए/१७०२ आर ०७, लाईफ रिपब्लीक सोसायटी मारुंजी, पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२०) रात्री दहा ते रविवार (दि.२१) सकाळी साडेदहाच्या दरम्यान फिर्यादी अनिल यांनी त्यांची अॅवेंजर दुचाकी (क्र.एमएच/१२/पीके/२५९२) ही राहत्या घराच्या राखीव पार्किंमध्ये लॉक करुन ठेवली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली. हिंजवडी पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.