हिंजवडीत पादचाऱ्याच्या एटीएममधून जबरदस्ती ६० हजार रुपये काढून चोरटा पसार

103

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – पायी चालेल्या एका तरुणाला मोपेड दुचाकीवरुन आलेल्या एका अज्ञात चोरट्याने, “तु माझ्या गाडीचा अपघात केला आहे, तुला बघुन घेतो”, असे म्हणून तरुणाच्या एटीएममधून जबरदस्तीने ६० हजार रुपये काढून घेत चोरटा पसार झाला. ही घटना मंगळवार (दि.११) सकाळी साडेआठच्या सुमारास बालेवाडी स्टेडीयम समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली.

याप्रकरणी तेजस हरिहर पटेल (वय २६, रा. ऐश्वर्या कम्फर्ट, चिंचवड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोपेड दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास फिर्यादी तेजस हे बालेवाडी स्टेडीयम समोरील रस्त्यावरुन पायी चालले होते. यावेळी मागून अॅक्टीव्हा मोपेड दुचाकीवरुन आलेल्या एका अज्ञात चोरट्याने तेजस याला “तु माझ्या गाडीचा अपघात केला आहे, तुला बघुन घेतो”, असे म्हणून जबरदस्ती त्याच्या एटीएममधील ३० हजारांची रोख काढून घेतली आणि पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक पवार आरोपीचा शोध घेत आहेत.