हिंजवडीत तरुणावर कोयत्याने वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न

1115

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून दोन जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि.११) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी लक्ष्मी चौकातील खुशबू पान शॉप जवळ घडली.

चैतन्य भगवान डुकरे (वय २२, रा. मुक्ताईनगर, हिंजवडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने गणेश साखरे आणि एका अज्ञात तरुणाविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी चैतन्य हा हिंजवडीतील लक्ष्मी चौकात असलेल्या खुशबू पान शॉप जवळ उभा होता. यावेळी त्याचे आरोपी गणेश आणि एका अनोळखी मुलासोबत किरकोळ कारणावरुन भांडण झाले. यावर आरोपींनी चैतन्यवर कोयत्याने वार करुन त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.