जुन्या भांडणाचा राग मनात धरुन चुलत्याने झोपेत असलेल्या पुतण्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक वार करुन त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.  ही घटना शुक्रवारी (दि.६) रात्री अकराच्या सुमारास हिंजवडी येथील माण भोईर वाडीमध्ये घडली.

सतीश अशोक भोईर (वय २७, रा. माण, मुळशी) असे  जखमी तरुणाचे नाव आहे.  याप्रकरणी कुऱ्हाडीने वार करणारे त्याचे चुलते सोपान पंढरीनाथ भोईर (वय ४५, रा. भोईरवाडी, माण, मुळशी) यांना हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवासांपूर्वी आरोपी चुलता सोपान भोईर आणि त्याचा पुतण्या सतीश भोईर यांच्या मध्ये काही कारणावरुन भांडणे झाली होती. याचा राग मनात धरुन  सोपान यांनी शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास पुतण्या सतीश झोपेत असताना त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चडवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सतीश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हिंजवडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास हिंजवडी पोलसी करीत आहेत.