हिंजवडीत इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

229

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.२२) रात्री उशीरा एकच्या सुमारास हिंजवडीतील एक्सर्बिया सोसायटीमध्ये घडली.

प्रभाकर भगवानराव हंबर्डे (वय २५, रा. मोशी) असे इमारतीवरुन पडून मृत्यू झालेल्या तरणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अकस्मीत मृत्यूची नोंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रभाकर हिंजवडीतील एका खाजगी कंपनीत कामाला होता. रविवार सुट्टी असल्याने तो हिंजवडीतील एक्सर्बिया सोसायटीमध्ये राहणाऱ्या त्याच्या मित्राकडे गेला होता. रात्री एकच्या दरम्यान तो बाथरुमच्या खिडकीतून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मृत प्रभाकरच्या मित्रांनी पोलिसांना दिली आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.