हिंजवडीतून मोठ्या प्रमाणात विदेशी सिगारेट आणि गुटखा जप्त

430

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – राज्यात गुटखा बंदी असताना देखील अवैधरित्या गुटखा आणि विदेशी सिगारेट विक्री सुरु असलेल्या एका दुकानावर धाड टाकू पोलिसांनी तब्बल ४७४ बॉक्स विदेशी सिगारेट आणि ४३ हजार ७७ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. हि कारवाई हिंजवडी मेझा ९ चौकातील दुकानावर करण्यात आली.

याप्रकरणी दुकान मालक नथमल मदनलाल सिरवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिसांना मुंबई येथील एका सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकाने मेझा ९ चौकातील सिरवी याच्या दुकानात मोठ्या प्रमाणात विदेशी सिगारेट आणि गुटख्याचा साठा आहे, अशी खात्रीशीर माहिती दिली होती. पोलिसांनी त्यानुसार नथमल सिरवी यांच्या दुकानावर धाड टाकली असता दुकानातील गोदामात ४७४ बॉक्स विदेशी सिगारेट आणि ४३ हजार ७७ रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. दुकान मालक नथमल सिरवी यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.