हिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

1007

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – मॅगीच्या गोदामात एका १८ वर्षीय तरुणीने लोखंडी रॉडला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळच्या सुमारास हिंजवडी फेज दोन येथून उघडकीस आली.

हसीना पटेल (वय १८, रा. हिंजवडी फेज दोन, मू.रा. कर्नाटक) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हसीना ही तीच्या आई-वडिल आणि भावासोबत हिंजवडी फेज दोन येथे राहत होते. त्याच्या घरा शेजारीच मॅगीचे गोदाम आहे. त्या गोदामावर तिचे वडिल आणि भाऊ कामाला आहेत. आज पहाटे तिच्या भावाने मॅगीचे गोदामाचे शटर उघडले असता गोदामात असलेल्या लोखंडी रॉडला दोरीच्या सहाय्याने हसीनाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. माहिती मिळताच हिंजवडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.