हिंजवडीतील बंटी बबलीने लावला महाराष्ट्र बँकेला ७० लाखांचा चुना

57

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – बंटी बबली या सिनेमा प्रमाणे हिंजवडीत एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या पती-पत्नीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या बावधन या शाखेला तब्बल ७० लाखांना गंडा घालून फरार झाले  आहेत.

याप्रकरणी बँक प्रशासनाने सोपान भगवंत पोखरकर (वय ४०) आणि त्याची पत्नी सोनाली सोपान पोखरकर (वय ३४) या दोघांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोपान आणि त्याची पत्नी सोनाली हे दोघे बालेवाडी येथील पार्क एक्सप्रसे या सोसायटीमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. यादरम्यान घरमालकाला न कळता त्यांनी फॅ्लटचे बनावट कागदपत्र बनवले आणि कर्ज घेण्यासाठी ते बावधान येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत सादर केले. यावर त्यांना तब्बल ७० लाखांचे कर्ज मिळाले. मात्र बँक प्रशासनाला ते कागदपत्र खोटे असल्याचे कळले यावर त्यांनी पोखरकर यांची चौकशी करण्या आधिच ते फरार झाले. त्यांनी हिंजवडी पोलीसात पोखरकर दाम्पत्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.