हिंजवडीतील तरूणाचा पवना धरणात बुडून मृत्यू

151

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – पोहताना पवना धरणात बुडून एका तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार) दुपारी १. ३० वाजण्याच्या सुमारास घडली.

अतुल अनिलकुमार गगन (वय. २३ मूळ रा. पटना, सध्या रा. इन्फोसिस, हिंजवडी) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नांव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्क येथील पाच तरूण आज पवना धरण परिसरात फिरायला गेले होते. दुपारी पवना धरणात पोहण्यासाठी ते उतरले. यावेळी पाण्यात बुडून अतुल याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आणि शिवदुर्ग मित्र रेस्कू टीमने घटनास्थळी धाव घेतली.

सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास अतुलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, ९ एप्रिलरोजी पवना धरणात बुडून पुण्यातील दोन महाविद्यालयीन तरूणांचा बुडून मृत्यू झाला होता.