हिंजवडीतील आई आणि मुलाच्या खूना प्रकरणी फरार आरोपीस अटक; संशयिताऐवजी दुसराच निघाला आरोपी

2451

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – हिंजवडीतील अश्विनी भोंडवे (वय २५) आणि अनुज भोंडवे (वय १० महिने) यांच्या हत्ये प्रकरणी पती दत्ता भोंडवे, प्रेयसी सोनाली जावळे, प्रशांत भोर आणि पवन जाधव या चौघांना हिंजवडी पोलिसांनी १२ तासातच अटक केली होती. या दुहेरी खून प्रकरणी एक संशयीत आरोपी फरार होता. त्याचे नाव नासिर उल (रा. पश्चिम बंगाल) असे आरोपींकडून सांगण्यात आले होते.

मात्र आरोपींची पुन्हा चौकशी केली असता नासिर उल हा खूनाच्या कटात सामिल नव्हता तर आरोपी पवन जाधव याचा भाऊ सावन जाधव शामिल होता असे समोर आले. पवना जाधव याने सर्व आरोपींना त्याच्या भावाचे नाव न घेण्यास सांगितले होते. यावर हिंजवडी पोलिसांनी सावन जाधव याला मंगळवारी (दि.१२) रात्री नऊच्या सुमारास अटक केली. त्याची चौकशी केली असता तो सुध्दा या खूनाच्या कटात सामिल होता याची कबुली दिली. हिंजवडी पोलीस अधीक तपास करत आहेत.