हा देश अमित शहा आणि मोदी यांच्या बापाचा नाही – रंजन चोधरी

192

कोलकाता,दि.१६(पीसीबी) – पश्चिम बंगालचे काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी “हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बापाचा नाही” अशी बोचरी टीका केली आहे. रंजन चोधरी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत बोलत असताना मोदी-शहांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

हा देश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बापाचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जे बोलणार तेच होणार ही गोष्ट आम्हाला मान्य नाही. तसेच हा देश कोणाच्या बापाची संपत्ती नाही, असंही रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे.

भाजपचे नेते आम्हाला पाकिस्तानी म्हणून हिणवतात. मात्र मी आता त्यांना सांगतो की, हो आहे मी पाकिस्तानी तुम्हाला जे करायचं आहे ते करा, असंही रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे.

WhatsAppShare