हार्दिक पटेलची प्रकृती खालावली; रूग्णालयात हलवले

612

अहमदाबाद, दि. ७ (पीसीबी) – पाटीदार आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफीसाठी गेल्या १४ दिवसांपासून पाटीदार नेता हार्दिक पटेल यांने उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, हार्दिकची  प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज (शुक्रवार) हलवण्यात आले आहे.

हॉस्पिटलबाहेर मोठ्या संख्येने हार्दिकचे समर्थक जमा झाले आहेत. त्यामुळे हॉस्पिटलबाहेर  कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हार्दिकने २५ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून त्याची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती.

पायात त्राण नसल्याने त्याला व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला आहे. गुरुवारपासून त्याने पाणी प्यायचे बंद केल्याने त्याची प्रकृती अधिकच खालावत चालली. आज हार्दिकची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.