हार्डवेअरचे दुकान फोडून सव्वा लाखांचे साहित्य लंपास

171

चाकण, दि. 26 (पीसीबी) : हार्डवेअर दुकानाचे पत्रे उचकटून दुकानातून फिटिंग वायर, सर्व्हिस वायर, पॉलिकॅब, बल्ब, टॉर्च आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 37 हजार 275 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता महात्मा फुले चौक, चाकण येथे उघडकीस आली.

प्रवीण अशोक हांडे (वय 28, रा. शेलगाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शैलेश्वर हार्डवेअर नावाचे दुकान आहे. दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताकडील पत्रे उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून फिटिंग वायर, सर्व्हिस वायर, पॉलिकॅब, बल्ब, टॉर्च आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 37 हजार 275 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.