हायकमांडपेक्षा बाळासाहेब थोरात मोठे नाहीत; राधाकृष्ण विखे-पाटलांचा पलटवार

67

मुंबई, दि.१४ (पीसीबी) – हायकमांड पेक्षा बाळासाहेब थोरात हे मोठे नाहीत. मला जे स्पष्टीकरण द्यायचे आहे. ते पक्षश्रेष्ठींना देईन, असे प्रत्युत्तर काँग्रेस नेते व विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

विखे-पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. नगरमधील काँग्रसचे नेते आणि माजी  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका उपस्थित केली होती. यावर विखे यांनी उत्तर दिले आहे.  विखे-पाटील म्हणाले की, थोरातांच्या पक्षनिष्ठेबद्दल बोलायचे झाल्यास मी खूप काही बोलू शकतो. मात्र, त्यासाठी ही जागा नव्हे.

दरम्यान, माझे वडील हयात नसताना त्यांच्याबदल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली  टिप्पणी  योग्य नाही. डॉ. सुजयने घेतलेला निर्णय त्याच्यासाठी योग्य असेल. मात्र, आघाडीला कोणतेही गालबोट लागले, असे विधान मी केलेले नाही. परंतू, शरद पवार यांच्याकडून केली जाणारी विधाने चुकीची आहेत, असेही विखे-पाटील यावेळी म्हणाले.