हातात सत्ता असणाऱ्यांकडून हिंसक घटनांना प्रोत्साहन – स्वामी अग्निवेश  

45

पुणे, दि. ९ (पीसीबी) – दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला जाताना माझ्यावर झालेल्या हल्ल्यातून मी बचावलो.  मात्र, माझ्यासह अनेकांवर दररोज हल्ले होत आहेत. ही निषेधार्थ बाब असून आपण ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली आहे, त्यांच्याकडून हिंसेच्या घटनांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे,  अशी टीका ज्येष्ठ विचारवंत स्वामी अग्निवेश यांनी भाजप सरकारवर केली.

पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्व भारतीय संविधान समर्थक परिवर्तनवादी संघटनेच्या वतीने ‘हिंसा के खिलाफ, मानवता के और’ या मोहीमे अंतर्गत धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी राज्य संकल्प परिषद या विषयावर ते बोलत होते.

यावेळी स्वामी अग्निवेश म्हणाले की,  देशातील सत्ताधाऱ्यांच्या विचाराविरोधात काही बोलल्यास देशद्रोहासारखा गुन्हा दाखल केला जातो. या सरकारने हार्दिक पटेलसारख्या तरुणावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल केला. तर मला देखील देशद्रोही ठरवले जात आहे. या सरकारने कितीही दबाव आणला तरी आम्ही चुकीच्या कार्यपद्धतीवर बोलणारच असे ते म्हणाले.