हराम कदमांविरोधात भाजपचे तोंडाळ पुढारी का बोलत नाहीत ?– शिवसेना

226

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – भाजप राम कदम यांच्या बेताल वक्तव्यावर शिवसेनेने  ‘सामना’च्या अग्रलेखातून टीकेची झोड उठवली आहे. तसेच त्यांच्या वक्तव्याचा आणि भाजपच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर हल्ला चढवला आहे. तसेच राम कदम यांचा उल्लेख हराम कदम असा करत त्यांच्यावर तोफ डागली आहे.

बेताल वक्तव्य करणाऱ्या या हराम कदमांविरोधात भाजपचाही एकही तोंडाळ पुढारी का बोलत नाही?, असाही संतप्त सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. भाजप विकृतीमुळे महाराष्ट्र धर्म बुडाला आहे, ही विकृती उखडून फेका, असे आवाहनही शिवसेनेने केले आहे. त्याचप्रमाणे प्रशांत परिचारक, रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यांचीही आठवण या अग्रलेखात करून देण्यात आली आहे.

भाजपाचे एक आमदार व मुख्यमंत्र्यांचे प्रिय ‘हराम’ कदम यांनी स्त्रीयांच्या बाबतीत अर्वाच्य, मानहानीकारक शब्द उच्चारून मस्तवालपणाचे प्रदर्शन केले आहे. दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी अत्यंत रुबाबात माईकवरून जाहीर केले की, ‘‘कोणती मुलगी आवडली असेल तर फक्त मला येऊन सांगा. त्या मुलीस उचलून तुमच्या हवाली करतो.’’ ही कसली भोगशाही आमच्या महाराष्ट्रात अवतरली आहे? असा संतप्त सवाल अग्रलेखात करण्यात आला आहे.