हडपसर येथील मैदानात खेळत असलेली सहा मुले बेपत्ता

87

पुणे, दि. ७ (पीसीबी) – पुण्यातील हडपसर येथून मैदानात खेळत असणारी सहा मुले गायब झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

सहमद आसार उद्दीन रजा (वय १३, बिहार), अन्नान महम्मद आजाद शेख (वय १२), अहसान निजाम शेख (वय १५), शाहनवाज जमालुद्दीन शेख (वय १६), अन्नारुल इसराइल हक (वय १३) आणि रिजवान आलम सलमुद्दीन शेख (वय १५) अशी गायब झालेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी महमदअबु तालीब शब्बीर आलम शेख (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुळे ३ जुलै पासून गायब आहेत. ३ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सय्यदनगर गल्ली नंबर २१ ए दारूल उलुम चिस्तीया जलालिया या मदरशाखालील मैदानात खेळण्यासाठी गेले होते. यावेळी या मुलांनी महरशाबाहेर टॉयलेटला जातो आहोत, असे सांगितले होते. पण त्यानंतर त्यांच्या विषयी कोणतीच माहिती मिळाली नाही. या मुलांच्या आई आणि वडिलांनी मुलांचा शोध घेण्याचा पुर्ण प्रयत्न केला. पण त्यांना ही मुले सापडली नाहीत। त्यानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस तपास करत आहेत.