अखेर हडपसर येथील बेपत्ता सातव आणि मगर कुटुंबीय सापडले

2152

पुणे, दि. २३ (पीसीबी) – खडकवासला येथे फिरायला गेलेल्या हडपसर येथील सातव आणि मगर  कुटूंब आखेर सापडले आहे. दोन्ही कुटुंबांशी आज (गुरुवार) अखेर संपर्क झाला. खडकवासला येथे फिरायला गेलेले मगर आणि सातव कुटुंबातील सात जण एकाएकी संपर्काबाहेर गेल्याने कुटुंबीय काळजीत पडले होते. मात्र पुण्याच्या हवेली तालुक्यातच आज दोन्ही कुटुंबं सापडली.

सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि जगन्नाथ हरी सातव हे दोघे आपल्या कुटुंबासह पानशेतला फिरायला गेले होते. सिद्धार्थ मगर यांच्या पत्नीचे बहिणीशी फोनवरुन काल दुपारी ११ वाजता बोलणे झाले होते.

तेव्हापासून या दोन्ही कुटुंबांकडे असलेले पाच मोबाईल नंबर बंद येत होते, त्यामुळे कुटुंबीय काळजीत पडले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत शोधाशोध झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र आज (गुरुवार) हवेली तालुक्यातच आज दोन्ही कुटुंबं सापडली आहेत.