हडपसर परिसरात १५ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू

0
503

पुणे, दि. १७ (पीसीबी) – हडपसर परिसरातील म्हाडा कॉलनीजवळ १५ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कुत्र्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

म्हाडा कॉलनीजवळ १५ कुत्री मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती शनिवारी (दि. १६) हडपसरच्या रहिवाशांना समजली. रहिवाशांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली.

मृतावस्थेत सर्व कुत्री आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी माहिती ताबडतोब हडपसर पोलिसांना दिली. सर्व मृत कुत्री शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आली आहेत.

रस्त्यावरील इतक्या मोठ्या संख्येत कुत्री एकत्र मरण पावली आहेत. त्यामुळे कुत्र्यांचा हा मृत्यू नैसर्गिक नसून कोणीतरी खाण्यातून विष देऊन हे कृत्य केल्याची शंका उपस्थित केली जात आहे.