हडपसरमध्ये पीएमपी बसमधून पडून वृध्द महिलेचा मृत्यू

134

हडपसर, दि. १० (पीसीबी) – पीएमपी बसमधून उतरत असताना बसचालकाने बस पुढे घेतल्याने तोल जाऊन वृध्द महिला बसच्या चाका खाली चिरडली गेली. ही घटना शनिवारी (दि.९) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास हडपसर येथे घडली.

शालन सुरेश घुले (वय ५९, रा. बेलहेकर वस्ती, मांजरी, हडपसर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बसचालक राजू पवार (वय २८, रा.हडपसर) याला हडपसर पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास वध्द शालन घुले या पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बेलहेकर वस्ती येथे आल्यानंतर त्या बसमधुन उतरत होत्या. त्याचवेळी बसचालकाने बस हलविली. त्यामुळे तोल गेल्याने घुले खाली पडल्या आणि त्याच बसचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. हडपसर पोलिसांनी बसचालक राजू याला अटक केली आहे.