हडपसरमध्ये गुंगीचे औषध देऊन सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार

3005

पुणे, दि. २ (पीसीबी) – सुनेला गुंगीचे औषध देऊन  सासऱ्याने तिच्यावर वर्षभर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ही घटना हडपसर पोलिस स्टेशन हद्दीत घडली.

पिडीत ३० वर्षीय सुनेने याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नराधम सासऱ्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ साली नराधम सासऱ्याने स्वत: च्या सुनेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी सासऱ्याने आपण केलेले कृत्य कोणाला सांगू नये यासाठी तिला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. आखेर या छळाला कंटाळून सुनेने हडपसर पोलिसात धाव घेत सासऱ्या विरोधात तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.