‘हक्कानी नेटवर्क’चा म्होरक्या जलालुद्दीन हक्कानीचा मृत्यू

42

इस्लामाबाद, दि. ४ (पीसीबी) – हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या जलालुद्दीन हक्कानीचा मृत्यू झाल्याची माहिती तालिबानने दिली आहे. दीर्घ आजाराने जलालुद्दीन हक्कानीचा मृत्यू झाल्याचे तालिबानने म्हटले असून हक्कानीचा मृतदेह अफगाणिस्तानमध्ये दफन करण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

‘हक्कानी नेटवर्क’ ही संघटना तालिबानशी संलग्न आहे. २०१२ साली अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी हक्कानी नेटवर्कला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले होते.