हक्कसोडपत्रावर सही करण्यास नकार दिल्याने मुलाला मारहाण; बापावर गुन्हा दाखल

119

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – वडिलांच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टी बाबत हक्कसोड पत्र बनवून त्यावर मुलाने सही करण्यास नकार दिला. यावरून वडिलांनी मुलाला कुलुपाने मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 18) दुपारी साडेचार वाजता चिंतामणी कॉलनी, बीजलीनगर, चिंचवड येथे घडली.

भूषण दिगंबर बडे (वय 24, रा. चिंतामणी कॉलनी, बीजलीनगर, चिंचवड) असे जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिगंबर लक्ष्मण बडे (वय 58) असे गुन्हा दाखल झालेल्या बापाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिगंबर बडे हा टेम्पो चालक आहे. त्याने त्याच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टी बाबत हक्कसोडपत्र बनवले. त्यावर फिर्यादी भूषण यांना सही करण्यास सांगितले. मात्र भूषण यांनी सही करण्यास नकार दिला. त्यावरून आरोपीने घरातील लोखंडी कुलुपाने मुलाच्या दोन्ही हातावर मारून जखमी केले. त्यानंतर हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare