स्वीप उपक्रमांतर्गत शहरात माहिती पुस्तिकेचे वितरण

333

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – पुणे जिल्हा निवडणूक कार्यालय आणि  चिंचवड विधानसभा मतदारसंघातर्फे स्वीप उपक्रमांतर्गत शहरात मतदारांसाठी माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आल्या आहेत.

माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी  एमआयडीसी येथील वंडर कार  कंपनीतील अधिकारी व कर्मचा-यांना  निवडणुक प्रक्रियेची माहिती दिली.  तसेच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच  मतदारांसाठी माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.  यावेळी वंडर कार प्रा.लि.चे मनुष्यबळ व्यवस्थापक प्रकाश सोनी व कर्मचारी उपस्थित होते.

WhatsAppShare