स्वातंत्र्यदिनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; काश्मिरी तरुणाला अटक

113

श्रीनगर, दि. ६ (पीसीबी) – स्वातंत्र्यदिनाला राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यात आला होता असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. जम्मूमधून रविवारी रात्री एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये तो प्रवास करत होता. तरुणाकडे मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडलं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाकडे ग्रेनेड तसंच ६० हजार रोख रुपये सापडले आहेत. तरुणाचा दहशतवादी असल्याचा जुना कोणताही रेकॉर्ड नाही आहे. तरुण काश्मीर खोऱ्यातून जम्मूत पोहोचला होता. तेव्हापासूनच तो सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता अशी माहिती आहे.

तरुणाने बस स्टॅण्डवरुन रात्री ११ वाजता दिल्लीला जाणारी बस पकडली होती. बस गांधीनगरला पोहोचताच जवानांनी बस थांवबून त्याला अटक केली. दरम्यान स्वातंत्र्यदिनाला दहशतवादी हल्ल्याची शक्यता असून त्यादृष्टीने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.