स्वप्निल वावरे प्रतिष्ठानच्या वतीने मावळातील विद्यार्थ्यांना वही वाटप

177

मळवली, दि. १६ (पीसीबी) – मावळ तालुका स्वप्निल वावरे प्रतिष्ठानच्या वतीने स्वप्निल वावरे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नायगाव येथील प्राथमिक शाळेला कपाट भेट देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले.

त्याचबरोबर कामशेत येथील पंडीत नेहरू विद्यालयातील १० वीतील २५ गरजू विद्यार्थ्यांची परीक्षा फी भरण्यात आली. शिवणे येथील एमफोर सेवा आश्रम येथे ४ सिलिंग पंखा भेट देण्यात आला.  यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या या सामाजिक कामाचे प्राचार्य, व्यवस्थापक यांनी कौतुक करून आभार मानले.

प्रतिष्ठानच्या वतीने वावरे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी मावळ तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांना व आश्रमांना आर्थिक व वस्तूरूपात मदत केली जाते. असेच सामाजिक काम पुढील काळात सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.