स्वप्ना बर्मनच्या पायांना मिळणार आधार; नाईक कंपनी बुटांचा खर्च उचलणार

442

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हेप्टाथलॉन प्रकारात सुवर्णपदक विजेच्या स्वप्ना बर्मनची चिंता अखेर मिटण्याची चिन्ह आहेत. स्पोटर्स फूटवेअर क्षेत्रातील नामांकित नाईक कंपनी स्वप्नासाठी विशेष बुट तयार करण्याच्या तयारीत आहे. स्वप्नाच्या दोन्ही पायांना जन्मत: सहा बोटे आहेत. त्यामुळे सरावादरम्यान तिला अनेकदा अनवाणी पायांनी पळावे लागत होते. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळताना तिला बुट तयार करून घ्यावे लागत होते.

मात्र जकार्तामध्ये केलेल्या सुवर्णकामगिरीनंतर चेन्नईतील Integral Coach Factory च्या अधिकाऱ्यांनी नाईक कंपनीला स्वप्नासाठी विशेष बुट बनवण्याची विनंती केली आहे. हेप्टाथलॉन प्रकारात खेळाडूला तिहेरी उडी, भालाफेक आणि शर्यत अशा विविध प्रकारांमध्ये सहभागी व्हावे लागते. या प्रत्येक प्रकारासाठी खेळाडूंकडे चांगल्या दर्जाचे किमान ५ बुट असणे आवश्यक असते. मात्र स्वप्नाच्या दोन्ही पायांना असणाऱ्या ६ बोटांमुळे तिला प्रत्येक खेळासाठी वेगळे बुट घेणे शक्य नव्हते. मात्र नाईक कंपनी पुढाकार घेत असल्यामुळे तिच्या मागची चिंता आता मिटण्याची शक्यता आहे.