स्वतंत्र लॅबची मागणी

77

पिंपरी, दि.26 (पीसीबी) : कोरोना संशयित रूग्णांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर तपाससणीचे रिपोर्ट येण्यास दोन दिवस लागतात.  तपासणी रिपोर्ट लवकर येणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने स्वंतत्र यंत्रणा किंवा लॅब उभारावी, अशी सूचना सत्ताधा-यांनी आयुक्तांना केली आहे. गेल्याच आठवड्यात भारतीय जनता पार्टी च्या जेष्ट नगरसेविका सीमा सावळे यानी निवेदनद्वारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे स्वतंत्र लबोरटरी ची मागणी केली होती.

आयुक्त दालनात आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीला महापौर उषा ढोरे, भाजपाचे शहराध्यक्ष, आ. महेश लांडगे, आ. आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसेवक विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहर रेडझोनमधून बाहेर पडल्यानंतर शहरातील लॉकडाऊन थिथिल केला आहे. त्यामुळे बाजारपेठ खुली झाली आहे. गेल्या चार दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढली आहे.

दिवसाला पाचशे संशयितांचे रिपोर्ट तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नारी संस्थेत पाठविले जात आहेत. मात्र, रिपोर्ट येण्यास दोन ते चार दिवसांचा कालखंड लागत आहे.

संशयितांना क्वारंटाईन करण्यापासून  रूग्णालयात दाखल करण्यापर्यंतची जबाबदारी महापालिका उचलत आहे. या कालखंडात पॉझिटिव्ह असणा-या आणि रिपोर्ट न आलेला एखादा व्यक्ती अधिक काळ क्वारंटाईन राहिला तर प्रसार अधिक होऊ शकतो.

WhatsAppShare