स्मार्टफोन दिला नाही म्हणून मित्रानेच केला मित्राचा खून

96

हैदराबाद, दि. १७ (पीसीबी) – स्मार्टफोन द्यायला नकार दिला म्हणून मित्रानेच मित्राचा खून करुन मृतदेह पेठवून दिल्याची धक्कादायक समोर आली आहे. ही घटना हैदराबाद येथील आदीबाटला येथे घडली.

डी. प्रेम उप्पल (वय १७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जी. प्रेम सागर (वय १९) असे मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उप्पल आणि प्रेम सागर हे दोघे चांगले मित्र होते. मात्र मोबाईल दिला नाही म्हणून प्रेम सागर याच्या डोक्यात प्रेम अप्पल विषयी राग होता. घटनेच्या दिवशी प्रेम सागर आणि डी. प्रेम उप्पल भेटले. त्यानंतर प्रेम सागर ने प्रेम अप्पल याला आपल्या बाईकवर बसवून आदीबाटला येथील निर्जन स्थळी घेऊन गेला व तिथे त्याच्या डोक्यात काठीने वार करुन हत्या केली. हत्या केल्या नंतर  प्रेम सागरने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतले व त्याला पेटवून दिले.  पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्याने स्मार्टफोनसाठी हत्या केल्याची कबुली दिली. हैदराबाद पोलिसांनी जी. प्रेम सागर या आरोपीला अटक केली आहे.