स्पोर्ट बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेचे पाऊण लाखाचे मिनी गंठण हिसकावले…

158

आळंदी, दि. २३ (पीसीबी) – आळंदी मधील एका दुकानासमोर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील 73 हजारांचे मंगळसूत्र स्पोर्ट बाईकवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्री उज्वल मंगल केंद्र व भांड्याच्या दुकानासमोर घडली.

शालन शंकर कु-हाडे (वय 49, रा. आळंदी, ता. खेड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 22) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी आळंदी येथील उज्वल मंगल केंद्र व भांड्याचे दुकान यासमोर थांबल्या होत्या. त्यावेळी स्पोर्ट बाईकवरून दोन अनोळखी चोरटे आले. दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील 73 हजार 500 रुपये किमतीचे 36.960 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसका मारून तोडून चोरून नेले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.