‘स्पा सेंटर’मध्ये वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा; तीन महिलांची सुटका

185

रहाटणी, दि. ९ (पीसीबी) – स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका एजंट महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 8) दुपारी शिवार चौक, रहाटणी येथील झिया थाई स्पा येथे केली.

वैष्णवी दिपक पवार (वय 27, रा पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक राजन महाडिक यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवार चौक, रहाटणी येथे स्पॉट 18 मॉलमध्ये झिया थाई स्पा मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास सेंटरवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली. तर एजंट असलेल्या एका महिलेवर गुन्हा दाखल केला. एजंट महिला पीडित महिलांकडून पैशाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होती. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare