स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालवणा-या महिलेवर गुन्हा दाखल

104

काळेवाडी, दि. १३ (पीसीबी) – स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालवणा-या एका महिलेच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पा सेंटरवर छापा मारून पोलिसांनी मंगळवारी (दि. 12) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पिंपरी येथे केली.

महिला आरोपी (वय 38, रा. तापकीरनगर, काळेवाडी) च्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुबराव गवारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी मधील डिलक्स मोबाईल मार्केट मॉलच्या पाचव्या मजल्यावर वेलनेस स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये आरोपी महिला दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई करत दोन महिलांची सुटका केली. तसेच स्पा सेंटर चालवणा-या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare