स्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती

199

पिंपरी, दि. 20 (पीसीबी): पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे रवी लांडगे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या स्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर उषा ढोरे यांनी आज झालेल्या महासभेत पालांडे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. पालांडे यांना चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावलताच मार्च महिन्यात रवि लांडगे यांनी तडकाफडकी 2 मार्च 2021 रोजी महापौर उषा ढोरे यांच्याकडे स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. महापौरांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता. सहा महिन्यांनी महापौर उषा ढोरे यांनी रवि यांचा राजीनामा मंजूर केला. त्यामुळे स्थायी समितीतील भाजपची एक जागा रिक्त झाली होती. रवी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी आजच्या महासभेत नवीन एका सदस्याची नियुक्ती केली.

सभागृह नेते नामदेव ढाके यांनी बंद पाकिटातून सुजाता पालांडे यांचे नाव महापौर ढोरे यांच्याकडे दिले. त्यानंतर महापौर ढोरे यांनी पालांडे यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.

WhatsAppShare