स्थायी समिती अध्यक्षपदी संतोष लोंढे यांची बिनविरोध निवड

204
पिंपरी, दि.६ (पीसीबी) – महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. संतोष लोंढे यांनी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी दि.२ सोमवार रोजी अर्ज दाखल केला. सत्ताधारी भाजपकडून संतोष लोंढे आणि राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांनी अर्ज दाखल केले होते.
मात्र राष्ट्रवादीच्या पंकज भालेकर यांनी माघार घेतल्यामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या संतोष लोंढे यांची आज( शुक्रवारी) बिनविरोध निवड करण्यात आली. निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रूबल अग्रवाल यांनी जाहीर केले.