स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सुरेशभाई सोनवणे यांचे निधन

41

पिंपरी, दि. 21 (पीसीबी): पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे जेष्ट नेते माजी शहराध्यक्ष तसेच महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सुरेशभाई रामचंद्र सोनवणे (वय – 74) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. जेष्ट सामजिक कार्यकर्त्या लता भिसे यांचे ते पती होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि दिवंगत शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचे समर्थक अशी सुरेशभाई सोनवणे यांची ओळख होती. हवेली तालुका विधानसभा निवडणुकीत त्यानी अपक्ष उमेदवारी केली होती. पुरोगामी चळवळीतील एक स्पष्टवक्तआ अभ्यासू, विचारी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

WhatsAppShare